✽ विशेष सन्मान - २०२३ ✽
कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवली ही आपली संस्था समाजात काही उदात्त हेतू ठेवून सतत कार्यरत व्यक्तींचे कौतुक करून त्यांचा आदर्श इतरेजनांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत असते.याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनात आपण ४ विशेष सन्मान करणार आहोत.
१ - श्री हेमंत गजानन सामंत - कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सभा (घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, कांजूरमार्ग व पवई) या संस्थेच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ ज्ञातीकार्यात कार्यरत आहेत.सहयोग आयोजित के.पी.एल - ५ च्या आयोजनासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
२ - श्री योगेश मोहन खानोलकर - आधुनिक संपर्क आणि दळणवळणाच्या या काळात कुडाळदेशकर ज्ञातीच्या कार्यासाठी ज्ञाती संबधित सकारात्मक माहितीचे प्रसारण समाज माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा तरुण सतत करत असतो.कुठच्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवता ज्ञातीसाठी सतत कार्यरत आहे.
३ - श्री सचिन कमलाकर प्रभुदेसाई आणि सौ सुप्रिया सचिन प्रभुदेसाई - "गुरुकृपा गृहोद्योग" च्या माध्यमातून रुचकर आणि पौष्टिक पदार्थांची निर्मिती आणि त्याची घरपोच सेवा हा उपक्रम हे कुटुंब चालवते.विशेषतः करोना काळात स्वतःचा जीव पणास लावून रुग्णांना जेवण पोचविण्याचे जे पुण्यकार्य त्यांनी केले त्याबद्दल सहयोग तर्फे त्यांचा विशेष सन्मान करण्यात येत आहे.
४ - श्री हेमंत सीताराम सामंत आणि सौ सुकन्या हेमंत सामंत - सहयोगचे एक आश्रयदाते असलेल्या कै. शिवराम वासुदेव तेंडोलकर यांची वार्धक्यकालीन सेवा करून या कुटुंबाने समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.स्वतःचे घर सोडून हे कुटुंब तेंडोलकर काकांसोबत एक वर्षाहून अधिक काळ राहिले व स्वतःच्या वडीलांप्रमाणे त्यांची काळजी घेतली.
वरील सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री राजाभाऊ पाटकर आणि प्रमुख पाहुणे डॉ हर्षवर्धन ठाकूर यांच्या हस्ते उद्याच्या वार्षिक स्नेहसंमेलनात पार पडणार आहेत.
✽ अभिनंदन आणि शुभेच्छा ✽