
संस्थेची माहिती
१९६७ साली स्थापन झालेल्या कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग ही संस्था डोंबिवलीतील एक आघाडीची संस्था आहे.सहयोग शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि वैद्यकीय सहाय्य या क्षेत्रात कार्यरत आहे. सहयोगचे उपक्रम हे ठाणे जिल्ह्याच्या दुर्गम भागापासून ते कोकणातील दुर्गम भागात पोहोचले आहेत.सहयोगची सद्याची कार्यकारिणी ही तरुणाईचा उत्साह आणि ज्येष्ठांचा अनुभव याचा उत्कृष्ठ मिलाप आहे.
वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय उपक्रम हे कुडाळदेशकर भवन,डोंबिवली तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित केले जातात.शिवराम वासुदेव आणि विजया शिवराम तेंडोलकर शैक्षणिक फंड, कै. सौ. लता वसंत कोचरेकर वैद्यकीय विद्यार्थी मदत प्रकल्प तसेच कै. अण्णासाहेब माईणकर शैक्षणिक साहित्य भेट प्रकल्प अंतर्गत प्रेरणा परिषद असेल अशा विविध योजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत निधी सुद्धा चालविला जातो.
सहयोगचे अनेक सहयोगी गट/समित्या आहेत ज्या कार्यरत आहेत यात विठ्ठल रखुमाई भजन मंडळ,स्वरांजली भक्तीगीत मंडळ, कुडाळदेशकर उद्योजक संस्था, सहयोग क्रिकेट कट्टा तसेच सहयोग विवाह कट्टा यांचा अंतर्भाव आहे. सहयोगला प्राप्त होणारी प्रत्येक देणगी हि आयकर कायद्याच्या ८०-ग अन्वये आयकरातून सूट मिळण्यास पात्र आहे.