• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman Sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

काळाचे भान राखून मार्गक्रमण करित असताना समाजातील विविध घटकांविषयी बांधिलकी दाखवून त्यांची उन्नत्ती साधण्यासाठी सतत कार्यरत असणारी संस्था.
✽   *सामुदायिक मौजीबंधन*   ✽
कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवली या आपल्या संस्थेतर्फे दरवर्षी प्रमाणे सामुदायिक मौंजीबंधन सोहळ्याचे आयोजन दिनांक २ मे २०२३ रोजी केले आहे. (मुहूर्त सकाळी ११.३८). ज्या कोणा इच्छुक बटूना नाव नोंदवायची इच्छा असेल आणि या विषयी अधिक माहिती हवी असेल त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा सौ वैशाली प्रभू. 99207 02375 सौ पौर्णिमा खानोलकर. 9930410313

✽   नम्र आवाहन   ✽
*सर्व ज्ञाती बांधवांना आर्थिक वर्ष २२-२३ च्या समाप्तीच्या निमित्ताने नम्र आवाहन* कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोगच्या माध्यमातून समाजातील गरजू आणि उपेक्षित वर्गासाठी शैक्षणिक तसेच वैद्यकीय उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जातात.फक्त डोंबिवलीच नाही तर उर्वरित महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटकातील बांधवांना शैक्षणिक आणि वैद्यकीय मदत दिली जाते. कुडाळदेशकर ज्ञातीचे संघटन ही अत्यंत प्रभावीपणें सहयोगच्या माध्यमातून होत आहे. *कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग या आपल्या संस्थेस मिळणारी प्रत्येक देणगी ८० - जी अन्वये आयकरातून सूट मिळण्यासाठी पात्र आहे.* ३१ मार्च २०२३ येतोय म्हणजेच २२-२३ या आर्थिक वर्षाचा शेवट जवळ येतोय.आयकरातून ८०- जी अन्वये कोणाला सूट घ्यायची असल्यास *आपण सहयोगच्या शैक्षणिक किंवा वैद्यकीय मदत निधीस आर्थिक योगदान देऊ शकता.* अधिक माहितीसाठी संपर्क - सौ प्रगती तिरोडकर - 93227 70122, सौ पौर्णिमा खानोलकर - 99304 10313 धन्यवाद आपला नम्र गणेश गुरुदास देसाई 9819959219

✽   सहयोग सांस्कृतिक कट्टा   ✽
*सहयोग सांस्कृतिक कट्टा* १९.०३.२०२३ सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळेत डोंबिवली येथील कुडाळदेशकर भवन येथे सहयोग सांस्कृतिक कट्टा आहे. सहयोगचे सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय येथे गायन,वादन, कथाकथन नृत्य अशा विविध कला सादर करू शकतात. या उपक्रमाचा जास्तीत जास्त ज्ञाती बांधवांनी लाभ घ्यावा.लहान वयोगटातील मुले सुद्धा सहभाग नोंदवू शकतात. कार्यक्रमासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आपण प्रेक्षक म्हणूनही कार्यक्रमास उपस्थित राहु शकता.ठिक ५.०० वाजता सर्वानी हजर राहावे हि विनंती. अधिक माहिती तसेच नोंदणीसाठी संपर्क- सौ पौर्णिमा खानोलकर- 99304 10313 सौ वैशाली प्रभू- 99207 02375

✽   सहयोग महिला मेळावा २०२३   ✽
कुडाळदेशकर गौडब्राह्मण सहयोग, डोंबिवलीचा *सहयोग महिला मेळावा* स्थळ: *कुडाळदेशकर भवन*, डोंबिवली दिनांक: *२५ मार्च २०२३* वेळ: *संध्याकाळी ४.००वा.* *"महिला संघटन ज्या संस्थेचे मजबूत त्या संस्थेचे भवितव्य उज्वल"* कार्यक्रम: 1. *सहयोग हिरकणी पुरस्कार २०२३* हा सुप्रसिध्द पत्रकार, लेखिका, अनुवादिका *सौ.पुजा‌ सामंत* यांना देण्यात येणार आहे. 2. कै.ज्योती पाटकर स्मृती *सेवाव्रती पुरस्कार - २०२३* मातृमंदीर, डोंबिवली या संस्थेत १९७५ पासून कार्यरत मुलींच्या आणि महिलांच्या अनेक समस्या निवारण करण्यासाठी कार्यरत *अनुराधा उल्हास आपटे* यांना देण्यात येणार आहे. 3. *स्थानिक महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम* *लकी ड्रॉ* संध्याकाळी 4-30 पर्यंत हजर होणाऱ्या महिलांसाठी *लकी ड्रॉ* *विजेत्यांना आकर्षक भेट* (कार्यक्रमाच्या अखेरीस लकी ड्रॉ काढण्यात येणार असून त्यावेळी सभागृहात उपस्थित असावे हि अट.)

✽   आग्रहाचे आमंत्रण   ✽
सहयोग