कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील महाविद्यालयीन विद्यार्थी जे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी त्यात प्रवेश घेतला आहे, त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवत आहे.
१) शिवराम वासुदेव आणि विजया शिवराम तेंडोलकर शैक्षणिक फंड- ही शिष्यवृत्ती योजना माननीय श्री शिवराम वासुदेव तेंडोलकर,मूळ गाव- झाराप यांनी सहयोगला दिलेल्या उदार देणगीतून चालवण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी इयत्ता दहावी किंवा बारावी पूर्ण करून इंजिनीरिंग, मेडिकल, संशोधन किंवा सनदी लेखापाल तत्सम कोर्सेस करणारे कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील गरजू आणि होतकरू विद्यार्थी अर्ज करू शकतात.
२) कै. सौ लता वसंत कोचरेकर वैद्यकीय विद्यार्थी सहाय्यता प्रकल्प-२०२२- ही योजना कै. सौ लता वसंत कोचरेकर यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय सहयोगच्या सहाय्याने चालवितात. या योजनेसाठी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील गरजू आणि होतकरू विद्यार्थी जे वैद्यकीय क्षेत्रात विविध कोर्सेस उदाहरणार्थ- डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन करू इच्छितात ते अर्ज करू शकतात.
३) सहयोग शिष्यवृत्ती योजना- ही योजना डोंबिवलीच्या रहिवासी असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आहे.