कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील महाविद्यालयीन विद्यार्थी जे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छितात किंवा ज्यांनी त्यात प्रवेश घेतला आहे, त्या गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवत आहे.
१) शिवराम वासुदेव आणि विजया शिवराम तेंडोलकर शैक्षणिक फंड- ही शिष्यवृत्ती योजना माननीय श्री शिवराम वासुदेव तेंडोलकर,मूळ गाव- झाराप यांनी सहयोगला दिलेल्या उदार देणगीतून चालवण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी इयत्ता दहावी किंवा बारावी पूर्ण करून इंजिनीरिंग, मेडिकल, संशोधन किंवा सनदी लेखापाल तत्सम कोर्सेस करणारे कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीतील गरजू आणि होतकरू विद्यार्थी अर्ज करू शकतात.
२) कै. सौ लता वसंत कोचरेकर वैद्यकीय विद्यार्थी सहाय्यता प्रकल्प-२०२४- ही योजना कै. सौ लता वसंत कोचरेकर यांच्या स्मरणार्थ कोचरेकर कुटुंबीय सहयोगच्या सहाय्याने चालवितात. या योजनेसाठी गरजू आणि होतकरू कुडाळदेशकर विद्यार्थी जे विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करतात ते पात्र आहेत.
३) सहयोग शिष्यवृत्ती योजना- ही योजना डोंबिवलीच्या रहिवासी असणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता आहे.
१) शिष्यवृत्ती विद्यार्थ्यास प्रदान करण्यासंबंधी संस्थेच्या कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असेल.
२) एकूणच अजून चालू असलेल्या प्रवेश प्रक्रियांमुळे अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.र्यंत असेल.
खालील क्रमांकावर संपर्क केल्यास संस्थेचे कार्यकर्ते योजनेची अधिक माहिती देतील.
अधिक माहितीसाठी संपर्क-
सौ. पौर्णिमा खानोलकर-९९३०४१०३१३
श्री. विजय परूळेकर-९९३०८४२४२८
ही माहिती कुडाळदेशकर ज्ञातीतील जास्तीतजास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी ही नम्र विनंती.🙏