• कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली

    Kudaldeshkar Gaud Brahman Sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

काळाचे भान राखून मार्गक्रमण करित असताना समाजातील विविध घटकांविषयी बांधिलकी दाखवून त्यांची उन्नत्ती साधण्यासाठी सतत कार्यरत असणारी संस्था.
✽   सामुहिक मौजीबंधन-२०२४   ✽
कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवली तर्फे सामूहिक मौजीबंधन-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. हा मंगल सोहळा शुक्रवार दिनांक २६ एप्रिल २०२४रोजी होणार आहे,मुहूर्त सकाळी ११ वाजून ३३ मिनिटांचा आहे. या सामूहिक मौजीबंधनात सहभागी होण्यासाठी प्रति बटु रु ६०००/- शुल्क असेल.या शुल्कात पुरोहितांची दक्षिणा,५ जणांचा नाश्ता,भोजन,काही पूजा साहित्याचा समावेश असेल.एका बटुचे पाच पेक्षा अधिक पाहुणे भोजनासाठी येणार असल्यास प्रति व्यक्ती रु ४०० चा भरणा संस्थेकडे करावा लागेल. **नोंदणीची शेवटची तारीख-** *३१मार्च २०२४* अधिक माहितीसाठी/नोंदणीसाठी संपर्क- सौ दिपाली वालावलकर- 9673172633, सौ पौर्णिमा खानोलकर-99304 10313

✽   सहयोग संघटन मोहीम   ✽
*सहयोग संघटन मोहीम* नमस्कार, कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवली या आपल्या ज्ञाती संस्थेने *स्वतःच्या सदस्यांची माहिती अद्ययावत करण्याच्या दृष्टीने* तसेच संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या डोंबिवली,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागातील स्वतःचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सहयोग संघटन मोहीम हाती घेतली आहे. डोंबिवली,कल्याण,उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागात राहणाऱ्या वयाची १८ वर्ष पूर्ण केलेल्या कुडाळदेशकर ज्ञातीतील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने खालील गुगल फॉर्म भरावयाचा आहे. *सहयोगला विशेषतः पुढील पिढीशी युवक युवती यांच्याशी जोडले जाणे आवश्यक वाटते.* गुगल फॉर्म द्वारे माहिती प्राप्त झाल्यावर संस्थेचे कार्यकर्ते आपणास संपर्क करतील. आपला नम्र गणेश देसाई कार्याध्यक्ष https://forms.gle/osJ64QREb6vXPkhm9 गुगल फॉर्म लिंक वर टिचकी मारून फॉर्म भरा. धन्यवाद अधिक माहितीसाठी संपर्क - 80073 50105, 96731 72633

✽   सहयोग महिला मेळावा २०२४   ✽
दिनांक १३ एप्रिल २०२४ रोजी कुडाळ देशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली येथे महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ओंकार इंटरनॅशनल शाळेच्या संस्थापिका आदरणीय श्रीमती दर्शना सामंत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात झाली. संस्थेच्या कार्यकारीणी सदस्य श्रीमती विनया सामंत यांनी कार्यक्रमांची प्रस्तावना केली. कै. ज्योती ताई स्मृती सेवाव्रती पुरस्कार - २०२४ हा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सौ मनीषा देसाई यांना सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेसाठी प्रदान करण्यात आला. हिरकणी पुरस्कार - २०२४ हा करियरच्या वेगळी वाट निवडणाऱ्या आणि दादर येथे ५० वर्षाहून अधिक कुकींग आणि छंद वर्ग चालवणाऱ्या आदरणीय नलिनी सामंत यांना प्रदान करण्यात आला. दोन्ही सत्कारमूर्तिनी उपस्थितांशी संवाद साधला तसेच श्रीमती दर्शना सामंत यांनी अध्यक्षीय भाषणात महिलांना मार्गदर्शन केले. सहयोगच्या माजी अध्यक्षा आदरणीय सरोज नेरुरकर यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले. स्वरयोग चे संस्थापक श्री प्रदीप देसाई यांनी दोन्ही पुरस्कार विजेत्या विदुषिंचे कौतुक केले. "वेध स्त्री मनाचा" हा गाणी आणि नृत्य यांचा मिलाप असलेला कार्यक्रम या निमित्ताने सहयोगच्या महिला सभासदांनी सादर केला. सुमन गवाणकर, स्मृती सामंत, योगिता नाईक, मानसी नाईक, प्रथमेश प्रभू यांनी गाणी सादर केली. तबल्यावर सोहम चारी, kyeboard वर दत्तात्रय दातार तर octopad वर प्रिया वझे यांनी साथ केली. शिव आणि शक्तीचा जागर हा योगासनाच्या सहाय्याने नृत्य करत सादर करण्यात आला. डॉक्टर वर्षा ठाकूर, स्वरा सामंत, स्मिता सामंत, मेघा तेंडोलकर, सारिका प्रभुदेसाई आणि पल्लवी सामंत यांनी यात भाग घेतला होता. अध्यक्षीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सारिका देसाई यांनी केले.सांस्कृतिक कार्यक्रमात समर्पक निवेदन सौ. पौर्णिमा खानोलकर यांनी केले. कार्यक्रमात शेवटी Lucky Draw विजेत्यांना आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या.आभार प्रदर्शनाची जबाबदारी सौ प्रगती तिरोडकर यांनी पार पडली. संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये प्रांजली राळकर, ईश्वरी ठाकूर, ममता ठाकूर, श्रृती रामदास, सुप्रिया प्रभुदेसाई, कविता पाटकर,श्रद्धा सामंत,वैशाली प्रभू, पल्लवी सामंत, शिल्पा सामंत,तन्वी ठाकूर, विभा वालावलकर अशा अनेक कार्यकर्त्यांचा सहभाग होता. पौर्णिमा खानोलकर

✽   ✽ *सामुहिक रामरक्षास्तोत्र पठण समारोप* ✽   ✽
सामुहिक श्रीरामरक्षा स्तोत्र पठण गुढीपाडवा ते रामनवमी असे नऊ दिवस कुडाळदेशकर भवन येथे सायंकाळी ७.०० ते ७.४५ या वेळेत चालू आहे. आज रामनवमी ७.०० ते ७.४५ या वेळेत सामूहिक रामरक्षा म्हणून उपक्रमाचा समारोप होणार आहे. या निमित्ताने ७.४५ वाजता विठ्ठल रखुमाई भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन आयोजित केले आहे. सर्व ज्ञातीबांधवांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमती पल्लवी सामंत यांनी केले आहे. धन्यवाद