• कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली

    Kudaldeshkar Gaud Brahman Sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

महिला दिन

सहयोग महिला मेळावा

महिला संघटन ज्या संस्थेचे मजबूत त्या संस्थेचे भवितव्य उज्वल दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग,डोंबिवलीच्या वतीने आयोजित प्रतिवर्षी प्रमाणे "महिला मेळावा" आयोजित करण्यात आला होता. तब्बल दोन वर्षांनी बाहेरची परिस्थिती निवळत असताना हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करायची संधी सहयोगला मिळाली अणि विशेषतः सर्व महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या परिश्रमांनी या संधीचे सोने केले. या कार्यक्रमात ज्योती पाटकर स्मृती सेवाव्रती पुरस्कार श्रीमती गीता प्रभू-बोरिवली तसेच हिरकणी पुरस्कार - सौ लीना पाटकर,पुणे यांना सहयोगच्या विश्वस्त श्रीमती दर्शना सामंत यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुप्रसिद्ध सुत्रसंचालिका आणि लेखिका सौ वृंदा दाभोलकर यांनी केले,पदार्थयन या सुप्रसिद्ध पुस्तकाच्या लेखिका असलेल्या दाभोलकर मॅडमचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात दापोली येथे होणाऱ्या के.पी.एल-७ मध्ये सहभागी होणाऱ्या सहयोग महिला संघाला व्यासपीठावर बोलावून शुभेच्छा देण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात पहिले बक्षीस पैठणी,दुसरे डिनर सेट अणि तिसरे लेमन सेट अशी बक्षिसे होती. शाहीर श्री ताम्हणकर यांचा "रंग शाहीरिचे" हा कार्यक्रम रात्रौ उशिरापर्यंत रमला. भजन,पोवाडा,गोंधळ, लावणी अश्या विविध लोककलांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सहयोगच्या विश्वस्त दर्शना सामंत,श्री रवींद्र खानोलकर तसेच उपाध्यक्ष श्री विनय तिरोडकर यांनी विशेष मदत केली होती.

img
img
img
alt
alt
alt
alt
alt