कार्यकारणी बाहेर राहिले. “गौड ब्राह्मण सभा, डोंबिवली या संस्थेचे पहिले अध्यक्ष कै. डॉ. अनंत नारायण पाटकर होते. चिटणीस कै. सखाराम विष्णु देसाई होते व खजिनदार कै. भास्कर भिकाजी आजगावकर होते. या संस्थेने ज्ञातीबांधवांसाठी व इतर समाजासाठी त्याकाळी भरीव असे कार्य केले. ते म्हणजे रुग्णोपयोगी साधनांची उपलब्धता व एक सामुदायिक मौजी बंधनाचा कार्यक्रम, सर्वच संस्थांत कार्यकर्त्या अभावी जशी मधूनमधून शिथिलता व मरगळ येते, तसे या संस्थेचे कार्य तीन-चार वर्ष चालून पुढे थोडे मंदावले.
पूर्वीच्या कालखंडात मुद्दाम स्वतंत्रपणे उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे जुन्या काळात नीतीमत्ता, सुबत्ता विशेष करुन माणसामाणसांमध्ये आत्मीयता होती व जोडीला संस्कारी मने होती. त्यामुळे एकत्र येण्याचा ओढा होता. ज्ञाती संस्था नसतानासुद्धा ज्ञातीतील माणसे प्रसंगानुसार एकत्र येत असत व एकमेकांच्या कुठल्याही अडचणीला ज्ञातीबांधव धावून जात असत. त्यांचे एकत्र येण्याचे उदाहरण म्हणजे सन १९४५ साली कै. डॉ. अनंत नारायण पाटकर यांच्या पुढाकाराने त्यांच्याच वाड्यात ज्ञातीतील आठ मुलांचा मौजीबंधनाचा कार्यक्रम झाला होता.कुठल्याही सुखद प्रसंगी ज्ञातीबांधव अगत्यपूर्वक एकमेकांना बोलावित असत आणि दु:खद प्रसंगीही आपले काम बाजूला ठेवून एकमेकांकडे धावून जाव असत. या कामात कै. नाना तिरोडकर, कै. बाळूअण्णा कोचरेकर, कै. भास्करराव आजगावकर, कै. जगन्नाथ व रामकृष्ण नेरुरकर बंधू, कै. आबा देसाई, कै. बापू पाटकर, कै. बापू ठाकूर व कै. कमलाकर देसाई यांचा उल्लेख खास करुन करावा लागेल. नंतरच्या काळात हेच काम कै. बाबल देसाई, कै. आबा परुळेकर, कै. रमाकांत पाटील, कै. पुरुषोत्तम कोचरेकर, कै. अण्णा खानोलकर ज्ञाती कर्तव्य म्हणून करीत असत. श्री. कमलाकर आ. देसाई ह्यांची आई कै. गंगाबाई उर्फ मामी ह्यांचा उल्लेखही तेवढाच महत्वाचा आहे. थोडक्यात ती आम्हा सर्वांची गावमामी होती. अशिक्षित पण धोरणी होती. काहीशी स्पष्टवक्ती होती पण तेवढीच मायाळू आणि परोपकारी होती. तिचा संपर्क सर्वत्र असे. आपल्या अडीअडचणींवर काहीतरी औषध-तोडगा मिव्ठेल म्हणून अनेकजण तिच्याकडे वडीलकीच्या नात्याने जात असत आणि कै. मामीच्या प्रेमळ व व्यवहारी बटव्यातून त्यांना हमखास औषध मिळत असे. तसेच पुढे कै. दिगंबर नारायण पाटकर यांच्या पत्नी सौ. काकी पाटकर आपल्या औषधी बटव्यातून ४०-५० वर्षे कावीळवर जालीम औषध देत असत.
आमचे ज्ञातीबांधव सुरुवातीपासून सामाजिक कार्यात कुठेही मागे नव्हते हे नमूद केले पाहिजे. या डोंबिवलीच्या जडणघडणीत त्यांचा महत्वाचा वाटा आहे. कै. गोविंद रामचंद्र सामंत तथा गणपतराव व त्यांचे बंधू श्री. दत्तात्रेय रामचंद्र सामंत यांच्या प्रयत्नाने सध्या जो डोंबिवलीचा मानपाडा रोड आहे तो तयार ज्ञाला. या रस्त्याची आखणी करुन जिल्हा परिषदेकडून तो रस्ता करवून घेतला. आज हा रस्ता डोंबिवलीचा क्रमांक १ चा राजरस्ता म्हणून ओळखला जातो. त्याला आता अनन्यसाधारण आर्थिक महत्व आलेले आहे. अनेक जणांना या रस्त्याकरीता आपल्या जमिनी द्याव्या लागल्या. नेरुरकर कुटुंबियांचीही खूप जमिन ह्या रस्त्याकरीता घेण्यात आली. त्यांत त्यांचे नुकसानही झाले. ह्या कुटुंबियांचा त्याग प्रशंसनीय आहे. त्यांच्या ह्या त्यागामुव्ठेच अनेकांचा फायदा झाला. डोंबिवलीला पूर्वी पाण्याचे खूप दुर्भिक्ष्य होते. पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. स्वत:ची आर्थिक परिस्थिती उत्तम असतानाही परोपकार हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून खूप लांबूनलांबून बैलगाडीने पाणी आणून पाणी पुरवठा नागरिकांना कै. गणेश विठ्ठल सामंत व कै. सखाराम विठ्ठल सामंत ह्या दोघा बंधूंनी नाममात्र दरात केला. त्यावरुन त्यांना “पाणीवाले सामंत अशी उपाधी लोकांनी लावली. डोंबिवलीला सर्व प्रथम ग्रामपंचायतीच्या काळात