केली. विजय कोचरेकर म्हणतात की, माझ्यापेक्षा यांनी कारकिर्द गाजविली. आरोग्य समितीच्या त्या सभासद होत्या. अत्यंत जागरुकतेने त्यांनी काम केले. आमची पहिली नगरसेविका म्हणून डोंबिवलीच्या ज्ञाती इतिहासात त्यांची नोंद करावी लागेल. नंतरच्या काळात श्री. राजन सामंत व श्री. मुकुंद देसाई हे काही काळ नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
१९५१ साली मुंबईबाहेर उपनगरात सर्वप्रथम ज्ञातीची उपशाखा सुरु केली. अशी कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीच्या संपूर्ण ज्ञाती इतिहासात नोंद करावी लागेल. दरम्यानच्या काळात १९६७ सालापर्यंत ज्ञातीबांधवांच्या कुटुबियांची संख्या साधारणपणे १५0च्या आसपास पोहोचली होती. आपली ज्ञाती संस्था असावी. तिचे काहीतरी भरीव कार्य असावे या विचाराने भारावून पुन्हा ज्ञातीबांधव एकत्र आले व १९६७ मध्ये कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली या संस्थेची स्थापना झाली आणि १९८६ साली संस्थेची धर्मादाय आयुक्ताकडे रितसर नोंदणी केली गेली. कै. बापूसाहेब पाटकर, कै. प्रभाकरपंत खानोलकर, कै. रत्नाकर सामंत, कै. शरद देसाई, कै. बापूसाहेब ठाकूर, कै. बाबासाहेब केळुस्कर, कै. नरसिंह आजगावकर, श्री. चित्तरंजन पाटकर आदींनी पुढाकार घेऊन कार्य केले. याच बरोबर श्री. पांडुरंग नेरुरकर, बाबा सरनाईक, विकास पाटील, प्रकाश ठाकूर, कै. रमाकांत देसाई, पुरुषोत्तम कोचरेकर हे तरुण कार्यकर्ते लाभले. त्यावेळी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोनच कार्यक्रम नियमित होत असत.
यानंतरच्या काळात गौड ब्राह्मण सहयोगने अनेक प्रकारे ज्ञातीबांधवांमध्ये सलोखा, प्रेम, हितसंबंध वाढविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. उदाहरणार्थ स्पर्धा, गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक रुपाने मदत, कथाकथन, हळदी-कुंकू, सामुदायिक मौजीबंधन, सहली, वधूवर सूचक विवाह मंडळ, स्नेहसंमेलन वगैरे परिश्रमपूर्वक घडवून आणले. तसेच अनेक पावसाळी सहली कै. आबासाहेब परुळेकर यांच्या बदलापूर येथील फार्मवर संपन्न झाल्या. तेथील सर्व व्यवस्था आबांनी स्वखर्चाने केल्या. सहयोगच्या सभांना कै. रत्नाकर सामंत, कै. बापूसाहेब पाटकर, श्री. पांडुरंग नेरुरकर, श्री. सुभाष सामंत इत्यादिंनी आपली जागा वेळोवेळी उपलब्ध करुन दिली. कै. दिगंबर आ. सामंत (एस.के. पाटील स्कूल) ह्यांनी सहयोगाच्या कार्यालयाला जागा उपलब्ध करुन दिल्यामुळे खऱ्या अर्थाने सहयोग स्थिरावले. सहयोगने आपल्या स्नेहसंमेलनात अनेक नामवंत डोंबिवली बाहेरील ज्ञातीबांधवांना निमंत्रित करुन कार्यक्रम सुशोभित केले. विशेष म्हणजे १९७५ साली श्री. माधवराव सामंत यांनी पुढाकार घेऊन परमपुज्य रामानंद स्वामींचा दाभोली मठ परंपरा प्रचायर्थ मुंबई दौरा आयोजिला होता. तेव्हा सहयोगाने पुढाकार घेऊन डोंबिवलीत परम्पुज्य स्वामींना निमंत्रित केले होते. प. पू. स्वामींजीची भव्य मिरवणूक उघड्या गाडीतून मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली होती. दाभोली मठाला देणगी स्वरुपात डोंबिवलीकर ज्ञातीबांधवांनी रोख रुपये ११,000/- च्याही वर दिले होते. देणगीदारांमध्ये त्यावेळी अग्रक्रमांकावर श्री.आबासाहेब परुळेकर होते. त्याच सुमारास २-३ वर्षे कै. उषा ठाकूर यांच्या नेवृत्वाराली महिला मंडळाने आपल्या समाजामध्ये क्रांती घडवली. यापूर्वी त्यावेळचे सेक्रेटरी विकास पाटील, प्रकाश ठाकूर, पांडुरंग नेरूरकर, बाबा सरनाईक यांनी सहयोगची धूरा सांभाळली होती.