• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

कुडाळदेशकर सहयोगचा इतिहास


सामंत, पाटील गुरुजी, पुरुषोत्तम कोचरेकर, अण्णा खानोलकर, अच्युत नाईक, न. ना. पंतवालावलकर, सविता देसाई, उषा ठाकूर, ज्योती पाटकर, सरोज नेरुरकर, अपर्णा (सुमन) सामंत, रमाकांत खानोलकर, गो. ना. पाटील, विकास देसाई, चंद्रहास सामंत, मोहन ठाकूर, रमेश गवाणकर, रमाकांत पाटील, दिपक वालावलकर,पांडुरंग देसाई, अरुण देसाई, श्रीकांत प्रभूदेसाई. सुभाष सामंत, अनिल सामंत, गजानन कोचरेकर, गिरीष ठाकूर, रमेश सामंत, बाबल देसाई, विठ्ठलराव वालावलकर, सुनिल खानोलकर, प्रसाद पाटील, संजय प्रभू, बाळ सामंत, शाम सामंत, चंद्रकांत ठाकूर या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे सहयोग आज भक्कम पायावर उभे आहे. श्री. न. ना. पंतवालावलकर यांनी सहयोगासाठी सल्लागार व मार्गदर्शनाचे फार काम केले.


    श्री. बाबल देसाई यांच्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावेच लागेल. ते स्पष्टवक्ते होते व मनाने निर्मळ, प्रसंगी हळवे, असा त्यांचा स्वभाव होता. डोंबिवलीच्या ज्ञातीसंस्थेच्या संपूर्ण कारकिर्दीत अशा झंझावती व्यक्तिमत्वाचा कार्यकर्ता तो पर्यंत झाला नव्हता. वेळ प्रसंगी पैसाही त्यांनी विना अपेक्षेने खर्च केला. अत्यंत प्रामाणिकपणे तळमळीने ज्ञातीकार्य उभे करण्याची त्यांची धडपड वाखाण्यासारखी आहे. ते उत्तम संघटक होते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याची त्यांची क्षमता होती. सार्वजनिक कामाव्यतिरिक्त कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत जीवनात डोकावून त्याच्या अडीअडणीला सर्वार्थाने त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे रहाणे हा त्यांचा विशेष गुण होता असे म्हणावे लागेल.


    श्री. शशिकांत व श्री. रमाकांत माईणकर यांनी वडील कै. सहदेव उर्फ अण्णासाहेब माईणकर व मातोश्री कै.इंदिराबाई सहदेव माईणकर यांच्या स्मरणार्थ कुडाळदेशकर हॉलसाठी १९९३ साली प्लॉट दिला. व कै. दिपक श्रीकृष्ण वालावलकर यांनी अतिशय हिमतीने सर्व अडथळे दूर करुन कुडाळदेशकर सहयोगची वास्तू १९९८ साली पूर्ण केली.


कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग डोंबिवली