• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

कुडाळदेशकर सहयोगचा इतिहास


    १९४७ सालापूर्वी जो स्वातंत्र्य संग्राम झाला त्यात अनेकांनी प्रत्यक्ष भाग घेतला. सक्तमजुरी, तुरुंगवास भोगला. स्वातंत्र्य सौनिक म्हणून अशांचा महाराष्ट्र शासनाने गौरव केला. अशा या गौरवमुर्ती डोंबिवलीत स्थायिक झालेले उद्योगपती श्री. लक्ष्मण जयराम परुळेकर (आबा) व श्री. गोविंद जयराम परुळेकर या बंधुव्दयांचा अभिमान वाटतो.


    कला विभागात श्री. वसंत भास्कर आजगांवकर यांचे नाव प्रथम क्रमांकाला घ्यावे लागेल. गेली पंचवीस वर्षे गीतरामायण, गीत शिवायन, गीत कृष्णायन, भावगीत, भक्तीगीते गाऊन त्यांनी प्रथम दर्जाच्या गायकांच्या पंक्तीतील एक गायक म्हणून नाव कमावलेले आहे. हजारोंच्या घरात त्यांनी आपले गायनाचे कार्यक्रम सादर केले तसेच आकाशवाणी व दूरदर्शनवर त्यांचे वरचेवर कार्यक्रम प्रक्षेपित होत असतात. त्यांच्या गायनाच्या ध्वनीफितीही बाजारात आलेल्या आहेत. श्री. रमेश दादाजी पाटील हे प्रख्यात जादूगार रमेश म्हणून नावारुपाला आलेले आहेत.सतत कुठे ना कुठे तरी त्यांचे कार्यक्रम होत असतात. परदेश दौरेही त्यांनी कार्यक्रमासाठी केले आहेत. कु. प्रार्थना पाटील, कु. रेश्मा सामंत व कु. वैशाली प्रभू यांचे नृत्यातील कौशल्य वाखाण्यासारखे आहे. यांचे कार्यक्रम गाजत आहेत. कै. कमलाकांत राजाराम सामंत हे नाट्यक्षेत्रात नावाजलेले असून त्यांनी दिग्दर्शलेली अनेक बालनाटके आकाशवाणी व दूरदर्शनवर सादर झाली आहेत. सहयोग ज्ञातीसंस्थेच्या कामातही ते रस घेत असत.


    कै. दिनकर मातोंडकर यांनी मुष्टियुद्धात राज्यस्तरीय स्पर्धा जिंकून आपले कौशल्य सिध्द केले आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रशिक्षक म्हणून निवड झाली होती. श्री. गोविंद झारापकर यांनी राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा जिंकल्या होत्या. व्यापार - उद्योग क्षेत्रातही आमचे डोंबिवलीचे ज्ञातीबांधव कुठेही कमी नाहीत. त्यांची गणना केली असता असे आढळून येते की, छोटे-मोठे असे अनेकजण आपली छोटी मोठी दुकाने ऑफिस थाटून व्यवसाय करीत आहेत. डोंबिवलीत राहून डोंबिवलीच्या बाहेरही व्यवसाय करणारे आहेत.


    निराश्रित सहाय्यकारी फंड, विद्यावृद्धी समाज ह्या आमच्या मान्यवर ज्ञातीसंस्थांचे काम कै. यशवंत विठ्ठल देसाई, कै. बापूसाहेब पाटकर, कै. बापूसाहेब ठाकूर, कै. सदानंद बागलकर, कै. दिनदयाळ परुळेकर व कै. श्रीरंग प्रभू यांनी अनेक वर्षे डोंबिवलीमध्ये सांभाळलेले आहे. हे नमूद करावेसे वाटते.


    सहयोग जे नावरुपाला आले आहे, त्यांमध्ये त्यात अनेकांचा हातभार आहे. कै. विशवनाथ त्रिंबक पाटकर, कै. प्रभाकर वि. खानोलकर, कै. सावळाराम मोरेश्वर ठाकूर, कै.भोळे नरहर प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली सहयोगची वाटचाल सुरु झाली. कै. गोविंद नारायण नाईक उर्फ दाजी नाईक यांचा उल्लेख विशेष म्हणून करावा लागेल. स्वत:ची आर्थिक परिस्थिती नसतांनाही सहयोगला पुढे येऊन सर्वप्रथम सतरंज्यांची वस्तुरुपात देणगी जुन्या काळात देणारे ते पहिलेच. कै. आप्पा मातोंडकर, कै. गो. शि. बागलकर ह्यांनी सहवोगसाठी केलेल्या कामाचे मूल्यमापन तेवढेच महत्वाचे आहे. आजपर्यंत सहयोगाचे प्रभावीपणे सातत्यपूर्वक ज्यांनी ज्यांनी आपला व्यक्तिगत वेळ खर्च करुन प्रत्यक्ष काम केले त्यांच्या नावाचा गौरवपूर्ण उल्लेख करणे उचित ठरेल. शरद आ. देसाई, बाबा सरनाईक, पांडुरंग नेरुरकर, विकास पाटील, प्रकाश ठाकूर, कमलाकान्त