• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

कुडाळदेशकर सहयोगचा इतिहास


     नंतर तरुण कार्यकर्त्यांच्या अभावी सहयोगचे काम परत थंड पडत चालले होते. ते लक्षात घेऊन १९८६-८७ च्या सुमारास कै. गुरुनाथ उर्फ बाबल देसाई यांनी समर्थ भजन मंडळाचे कार्यकर्ते पुरुषोत्तम कोचरेकर यांच्या सहाय्याने सहयोगमध्ये पदार्पण करून या ज्ञातीच्या वाघाने डोंबिवलीचा ज्ञाती समाज ढवळून काढला व चैतन्य निर्माण केले. त्यातूनच १९९१ चे राज्यस्तरीय सम्मेलन घडवून आणले. तसेच दाभोली मठाच्या जीर्णोद्धाराचे नेतृत्व त्यांनी स्वीकारले. सबंध ज्ञातीमध्ये चैतन्य निर्माण करण्याचे सामर्थ्य व संघटनात्मक काम करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. असा जाज्वल्य इच्छाशक्तीचा ज्ञाती गृहस्थ यापूर्वी ज्ञाला नाही. ती कुडाळदेशकरांच्या अभिमानाची पेटती मशाल होती. कै. बाबल देसाई यांच्या कार्याला भिकाजी वालावलकर, दिपक वालावलकर, संतोष सामंत, चंद्रहास सामंत, गजानन कोचरेकर, विकास देसाई, मोहन ठाकूर, रमेश गवाणकर, रमाकांत पाटील, पांडुरंग देसाई, अरुण देसाई, श्रीकांत प्रभुदेसाई, सुभाष सामंत, अनिल सामंत, गजानन कोचरेकर, गिरीष ठाकूर, रमेश सामंत, विठ्ठलराव वालावलकर, सुनिल खानोलकर, प्रसाद पाटील, संजय प्रभू, दिपक पाटील, ज्योती पाटकर,सविता देसाई, अपर्णा सामंत, सरोज नेरुरकर या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे सहयोग आज भक्कम पायावर उभे आहे. सहयोगच्या या कार्यकारणीने दूर गेलेल्या ज्ञातीबांधवांना जवळ आणण्याच्या दृष्टीने जी पावले उचलली आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल. सन १९८५ सालापासून ज्ञातीची वास्तू निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या.


    महाभारतातील महारथी कर्णाच्या उदारपणाच्या गोष्टी आपण सर्वांनीच वाचल्या आहेत. परंतु या कलियुगात आम्हाला माननीय श्री. रमाकांत सहदेव माईणकर व माननीय श्री. शशिकांत सहदेव माईणकर या बंधूंच्या रूपाने परत एकदा कर्णाच्या दावृत्वाचे दर्शन घडले. कोणतीही अपेक्षा मनी न ठेवता आपली लाख मोलाची जागा, ज्ञातीची वास्तू बांधण्यासाठी दान म्हणून आम्हा ज्ञातीबांधवांस अर्पण केली. खरोखरच आम्ही निदान डोंबिवलीकर ज्ञातीनांधवांनी तरी आपल्या कुलदैवतेप्रमाणे माईणकर बंधुंना ज्ञातीदैवत मानणे वावगे ठरणार नाही. असो! त्यानंतर ही वास्तू होण्याविषयीचा इतिहास पाहता माननीय कै. आबासाहेब परूळेकर व माननीय कै. बाबल देसाई ह्या द्वयींनी आपल्या समाजाची वास्तू व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. सन १९८५-८६ पासून व रील द्वयींबरोबर श्री. दिपक वालावलकर हेही काम करीत होते. त्यांनी स्वत:चा अमूल्य वेळ सहयोगसाठी देऊन, बुध्दीचातुर्याने अंतस्थ व बाह्यस्थ विरोध व कारस्थाने समर्थपणे पचवून आजची दिसणारी ही नयन मनोहर वास्तु आकारास आणली आहे. अर्थात या त ऍड. रुघुनाथ द. देसाई (अध्यक्ष), कुबेराची भूमिका साकारणारे श्री. भिकाजी वालावलकर (खजिनदार), श्री. गजानन कोचरेकर (सेक्रेटरी), श्री. दिपक पाटील, श्री. विजय कोचरेकर तसेच इतर सर्व कार्यकारिणी सदस्य यांचे सहकार्य मिळाल्याने हे साध्य झाले आहे.


    माननीय रमाकांत सहदेव माईणकर व माननीय शशिकांत सहदेव माईणकर यांनी त्यांचे वडील कै. सहदेव माईणकर व मातोश्री कै. इंदिराबाई सहदेव माईणकर यांच्या स्मरणार्थ कुडाळदेशकर भवनासाठी डोंबिवलीत प्लॉट १९९३ साली दिला आणि १९९८ डिसेंबरमध्ये हॉल पूर्ण झाला. तो प्लॉट मिळविण्यात त्यांचा विश्वास संपादन करण्यात कै. दिपक श्रीकृष्ण वालावलकरांनी एक वर्ष पाठपुरावा केला. दिपक वालावलकरांचे लँड रेव्हेन्यूचे ज्ञान पाहून दिपक वालावलकर व त्यांच्या सहका-यांवर त्यांनी विश्वास दाखवला. दिपक वालावलकरांनी हिकमतीने सर्व अडथळे दूर करून सहयोयचा माईणकर हॉल अस्तित्वात आणला.