• Hw$S>m>iXoeH$a Jm¡S$ ~«m÷U gh`moJ, S>m>o§[~dcr

    Kudaldeshkar Gaud Brahman sahayog, Dombivli

    Registration No. A 877, Thane.

कुडाळदेशकर सहयोगचा इतिहास


दिलासा देणारा, शांत बोलणारा व यशस्वी हात असलेला डॉक्टर म्हणून त्यांचा लौकिक आहे. यशस्वीपणे दवाखाना चालविणारी म्हणून पहिली स्त्री डॉक्टर म्हणून डॉ. सौ. सविता ना. देसाई यांचा उल्लेख करणे योग्य ठरेल. कल्याण महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये मेडीकल ऑफिसर म्हणून असलेले डॉ. दयानंद यशवंत सामंत यांचा दवाखाना डोंबिवलीत पश्चिमेला असून नवीन असूनही अल्पावधीत ते लोकप्रिय ठरले आहेत. वैद्य महेश ठाकूर हे ही डोंबिवलीतील एक प्रसिध्द डॉक्टर असून व्यवसायाच्या बरोबरीने अनेक संस्थांच्या कार्यात त्यांचा सहभाग असतो. वैद्य बाबा केळुस्कर (भोळे नरहर प्रभू) यांनी आयुर्वेदिक औषधांचे भारत वनौषधालय असे दुकान काढले. अशा धर्तीचे दुकान डोंबिवलीत एकमेव आणि ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ येथेही नाही. त्यानंतर त्यांचा वैद्यकीय वारसा त्यांचे चि. वैद्य नरहर भोळे प्रभू नी चालू ठेवला असून आयुर्वेदिक दुकानाचा वारसा त्यांचे दुसरे चि. श्री. सुधीर प्रभू यांनी चालू ठेवला आहे. मोठ्या विश्वासाने या सर्व परिसरातील लोक त्यांच्या दुकानांत औषधासाठी येतात. अत्यंत साधी राहणी व वैद्यकीय सेवा ही ईश्वराची सेवा हे प्रमाण मानून रोग्यांना खात्रीलायक औषधे मिळावीत म्हणून स्वत:चाच औषधांचा कारखाना त्यांनी काढला. आज त्यांचे तीन मुलगे यशस्वीरित्या त्यांची गादी विभागवार चालवित आहेत. गेली ४० वर्षे सौ. सुनिता दिगंबर पाटकर या कावीळ व श्वानदंशावर विनामुल्य औषध लोकांना देत आहेत हे अभिमानास्पद आहे.


    आमच्या तीन ज्ञाती भगिनी कै. उषा ठाकूर, ज्योती पाटकर व सरोज नेरुरकर या समाजिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. याचा विशेष उल्लेख करावा लागेल. कै. उषा ठाकूर यांचा परिचय पूर्वी आलेलाच आहे. ज्योती पाटकर ह्या धडाडीच्या, अत्यंत प्रामाणिक व जागरुकतेने काम करणाऱया म्हणून त्यांचा लौकिक आहे. भारतीय जनता पक्षाच्या माहिला आघाडीच्या त्या प्रमुख कार्यकर्त्या असून अनेक संस्थांवर त्या महत्वाची पदाधिकारी म्हणून काम करीत आहे. योजनाबद्ध कामामुळे आपल्या कामाचा ठसा त्यांनी प्रत्येक ठिकाणी उमटविलेला आहे. सरोज नेरुरकर ह्या प्रसिध्दीच्या झोतापासून दूर राहून इंडियन गील्ड फॉर हॅन्डीकॅप्ड या राष्ट्रपातळीवर काम करणाऱ्या संस्थेचे गेली १५ वर्षे कार्य करीत आहेत. ह्या संस्थेने अंधांसाठी भरीव कामगिरी केली असून, त्या संस्थेच्या सौ.सरोज नेरुरकर गेली २ वर्षे अध्यक्षा आहेत. या तिघीही सहयोगच्या कामात रस घेतात हे विशेष. सौ. अपर्णा (सुमन) सामंत, महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त अधिकारी, याही ज्ञाती कार्यात मोठा सहभाग घेतात. काही काळ त्याही सहयोगच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या सहयोगच्या एक विश्वस्त आहेत.


    राजकीय क्षेत्रात अन्य ठिकाणीही आमचे तरुण ज्ञातीबांधव तळपत आहेत . श्री. विकास दिगंबर उर्फ राजाभाऊ पाटकर हे डोंबिवली ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्वक कामाच्या पद्धतीने त्यांनी सर्वत्र आपली छाप पाडलेली आहे. डोंबिवलीच्या बिल्डर्स असोसिएशनसचे ते उत्पादक सदस्य व अध्यक्ष आहेत.अभिनव सहकारी बँकेचे ते उपाध्यक्ष होते. पर्यावरण संबंधाने वृक्षमित्र मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सातत्यपूर्वक धडाकेबाज वृक्षदिंडी - वृक्षारोपण आदि. कार्यक्रम त्यांनी डोंबिवलीत यशस्वीरीत्या राबविलेला आहे. श्री. चंद्रशेखर (नितीन) श्रीकृष्ण पाटकर हे युवक काँग्रेस कमिटी, डोंबिवली चे अध्यक्ष असून डोंबिवली व्यापारी संघाचे उत्पादक सदस्य व अध्यक्ष आहेत. श्री. सुहास उर्फ बाळ सामंत हे धडाधडीचे कम्युनिस्ट कार्यकर्ते असून डोंबिवली विभागाचे चिटणीस होते व सध्या त्यांचे वास्तव्य ठाणा येथे आहे. डोंबिवली बाहेर ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी विभागात त्यांचे बरेच काम आहे.